राहूल-अण्णांमध्ये आता गोड पत्रव्यवहार

राळेगणसिद्धी- गेल्या काही दिवसांपासून अण्णा् हजारे व राहूल गांधी यांच्यातील बिघडलेले संबध पुन्हा सुरळीत झाले आहेत. लोकपाल विधेयकावरून काँग्रेस आणि अण्णांमध्ये आत गोड पत्रव्यवहार सुरु झाला आहे. आधी अण्णांनी राहुल गांधी यांचे लोकपाल विधेयकासाठी प्रयत्न केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तर त्याला उत्तर देताना राहुल गांधी यांनीही अण्णा हजारेंना लोकपालच्या लढाईसाठी धन्यवाद दिले आहेत. मंगळवारी अण्णांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यांचे वजनही कमी झाले आहे. त्यांची प्रकृतीही खालावत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

दरम्यान, लोकपाल विधेयक मंगळवारी राज्यसभेत मांडले जाणार असले तरी अण्णा आपले उपोषण मागे घेणार नाहीत. लोकपाल विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यास पुन्हा लोकसभेकडे येईल आणि त्यानंतर राष्ट्रपतींच्या सहीसाठी पाठवण्यात येईल. त्यामुळे जोपर्यंत लोकपालचा कायदा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत अण्णांनी आपलं उपोषण न सोडण्याचा निर्धार केला आहे.

मंगळवारी अण्णांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यांचे वजनही कमी झाले आहे. त्यांची प्रकृतीही खालावत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. त्यामुळं राळेगणच्या यादव बाबा मंदिरातच डॉक्टरांनी अतिदक्षता विभागाची उभारणी केली आहे.दरम्यान राज्यसभेत नेमकी काय चर्चा होते हे पाहण्यासाठी राळेगणसिद्धीमध्ये आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या स्क्रिन लावण्यात आल्या आहेत.

Leave a Comment