पंतप्रधानपदासाठी मोदी, राहुल यांच्यात लढतीची शक्यता

नवी दिल्ली: आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातच लढत होणार आहे. मोदी आणि राहूल यांच्या लढत होणार याच्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. कारण काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून अखेर राहुल गांधी यांची घोषणा होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

आगामी काळात म्हाणजेच १७ डिसेंबर रोजी मंगळवारी दिल्लीत होणा-या राहूल गांधी यांची पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत राहूलच्याल नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी आज सकाळीच या बैठकीबद्दल माहिती दिली.

काही दिवसापूर्वी झालेल्या पाच पैकी चार राज्यांमध्ये पराभव झाल्याने राहुल गांधी यांचे नाव घोषित न करता, काँग्रेस विनाचेहराच निवडणुका लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण तसे करणे धोकादायक ठरेल असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे आता या बैठकीचा घाट घालण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता आगामी काळात राहूल विरुद़ध मोदी अशी लढत पाहण्यास मिळणार आहे.