जादू-टोण्यांसाठी परप्रांतीय जबाबादार-उद्धव ठाकरे

मुंबई – महाराष्ट्रात होणा-या जादू-टोण्यांसाठी परप्रांतीय जबाबादार असल्याचा आरोप करत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जादू-टोणा कायद्यावर टीका केला आहे. उद्धव यांनी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी फक्त कायदे करून उपयोग नसल्याचे सांगत अशा स्वरूपाची विकृती माणसाच्या मनातून उखडून टाकण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

याबाबत बोलताना उद़धव ठाकरे म्हणाले, अंधश्रद्धाविरोधी म्हणजेच जादूटोणाविरोधी कायदा मंजूर होऊन चोवीस तास उलटायच्या आधीच वसईत नरबळीचे प्रकरण उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी टीका केली आहे. परप्रांतीयांमुळे मुंबई-महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढल्याचे गृहमंत्र्यांनी कबूल केले होते, असे सांगत वसईतील नरबळी हा त्याचाच पुरावा आहे.

ज्यांनी हा गुन्हा केला ते यादव, गुप्ता असून ते परप्रांतातून आलेले आहेत. उत्तर प्रदेश, बिहारची भुताटकी पुरोगामी महाराष्ट्रात नाचत आहेत. परप्रांतातून आलेल्या निरक्षर व अज्ञानी मंडळींमुळेच फुले-आंबेडकरांचा वारसा सांगणार्यात महाराष्ट्रात हे असे अघोरी प्रकार वाढत चालले असून त्यामुळेच महाराष्ट्राची बदनामी होत असल्याची टीका उद्धव यांनी केली आहे.

Leave a Comment