जादूटोणाविरोधी विधेयक आज विधानपरिषदेत मांडणार

नागपूर: गेल्या १८ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले जादूटोणाविरोधी विधेयक सोमवारी विधानपरिषदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. हे विधेयक विधानपरिषदेत मांडले, तर ते मंजूर होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. जादूटोणाविरोधी विधेयककाला भाजप- शिवसेनाचा विरोध आहे.

नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर हे विधेयक तातडीने मंजूर करावे अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार हिवाळी अधिवेशनात आधी हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. पण त्यानंतरही शिवसेना आणि भाजपचा विरोध कायम राहिला. आता विधानसभेतल्या मंजुरीनंतर जादूटोणाविधेयकाची अखेरची परीक्षा आता विधानपरिषदेत होणार आहे.

जादूटोणाविरोधी विधेयक सोमवारी विधानपरिषदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. हे विधेयक सोमवारी मंजूर झाल्यास दाभोलकरांच्या लढाईला आणि बलिदानाला काही प्रमाणात न्याय मिळाला असे म्हणता येईल.

Leave a Comment