पुणे- राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले खासदार सुरेश कलमाडींना येत्या लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसकडून तिकिट मिळण्याबाबतच्या चर्चेला ऊत आला आहे. पुणे महापालिकेतील विविध ठिकाणी लावलेले खासदार कलमाडी यांचे लावलेले फोटो दोन दिवसापूर्वी काढून टाकण्यात आले आहेत. त्या मुळे आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीत कलमाडींना तिकिट मिळणार नसल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून समजते. पुण्यातून कलमाडीचे पक्षातंर्गत विरोधक मोहन जोशी, अनंत गाडगीळ याचबरोबर दीपक मानकर लोकसभेसाठी इच्छूक असल्याचे समजते.
चार राज्याच्या विधानसभा निवडणूकीत भ्रष्टाचाराचा फटका बसल्याने कॉग्रेसन आता ताकही फंकून प्याययचे ठरविले आहे. राष्ट्रकुल घोटाळ्यानंतर कलमाडींना निलंबित करण्यात आले होते तरीही पुणे काँग्रेसमधील त्यांचे वर्चस्व जगजाहिर होते. मात्र, प्रदेश काँग्रेसने पुण्यातील पक्षातील नेत्यांना व नगरसेवकांना कलमाडीबरोबर कुठल्या् कार्यक्रमांना हजेरी लावू नका, असा गंभीर इशारा दिल्याने येत्या लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून सुरेश कलमाडींचा पत्ता कट झाल्याचे निश्चित मानले जात आहे.
महागाई, भ्रष्टाचाराचे मुद्दे विविध राज्यात खूपच प्रभावी ठरीत असल्याचे चार राज्याच्या निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे.काँग्रेसने या निकालापासून बोध आणि धडा घेतला असून, डागी नेत्यांना पक्षात यापुढे कोणतेही स्थान नसेल, असे राहुल गांधींच्या गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यातून कलमाडी नसतील काँग्रेसचा उमेदवार नसतील हे स्पष्ट झाले आहे. त्यायमुळे कोण उमेदवार असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.