चेतेश्वर पुजाराला आयसीसीचा पुरस्कार

मुंबई – टीम इंडियाचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला आयसीसीचा एमर्जिंग क्रिकेट ऑफ द ईयर पुरस्कार मिळाला आहे. गेल्याध काही दिवसांपासून पुजाराने टेस्टमध्ये धडाकेबाज बॅटिंग केली आहे. त्या.नी आपल्याय फलंदाजीच्याा माध्येमातून वेगळी छाप सोडली आहे. त्यामुळेच त्याला आय़सीसीचा एमर्जिंग क्रिकेट ऑफ द ईयर पुरस्कादर पुरस्कार मिळाला आहे.

चेतेश्वर पुजाराने १५ टेस्टमध्ये ६५.५० च्या सरासरीनं १३१० रन्स केले आहेत. यामध्ये त्यानं ५ सेंच्युरीज झळकावल्या आहेत. त्याचप्रमाणे नॉटआऊट २०६ रन्स ही त्याची टेस्टमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. चेतेश्वर पुजाराने टेस्टमध्ये केलेल्यां कामगिरीमुळे आयसीसीने त्याीचा सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्याे यंगिस्तानचा आणखी एक युवा चेहरा. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपत आहे. आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, टेस्ट सीरिज सुरू होण्यापूर्वी पुजाराचा आत्मविश्वास वाढवणारी एक चांगली घटना घडली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या वार्षिक पुरस्कारांमध्ये त्याला इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कार जाहीर झाला आहे. टेस्टमध्ये फास्टेट एक हजार रन्स करणा-या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये त्याने दुसरा क्रमांकही पटकावला होता. आयसीसीने याची दखल घेत त्याला एमर्जिंग क्रिकेटरचा पुरस्कार जाहीर केला. टेस्ट सीरिजपूर्वी जाहीर झालेला आयसीसीचा पुरस्कार पुजाराचा आत्मविश्वास दुणावणार ठरणार आहे. आता मायदेशात ज्याप्रमाणे पुजाराच्या बॅटची जादू चालली. त्याचप्रमाणे आफ्रिकेतही त्यानं आपल्या बॅटची कमाल दाखवावी अशी आशा त्याच्या चाहत्यांना असणार आहे.

Leave a Comment