मुंबईत टॉवरला आग; होरपळून सात जणांचा मृत्यू

मुंबई – सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत मुंबईतील केम्पस कॉर्नर येथील मॉंट ब्लान्स टॉवरला होरपळून सात जणांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. आगीत अडकलेल्यांची सुटका करताना अग्निशमन दलाचे दोन अधिकारी आणि चार जवान असे सहाजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारार्थ हॉस्पिटलमध्येस दाखल करण्यारत आले आहे. अग्निशमन दलाच्या चौदा बंबानी अथक प्रयत्नांनी रात्री उशिरा ही आग आटोक्यात आणली.

दक्षीण मुंबईतील मॉंट ब्लान्स टॉवरमधील बाराव्या मजल्यावर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास प्रथम आगीचा भडका उडला. त्यानंतर ही आग वरच्या मजल्यापर्यंत पसरली. बाराव्या मजल्यावरुन आगीच्या मोठया ज्वाळा बाहेर पडताना दिसत होत्या. आग लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून लिफ्ट तात्काळ बंद करुन रहिवाशांना जिन्यावरुन खाली उतरवण्यात आले.

दरम्यान, या आगीत इमारतीतील सात रहिवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. काही मृतांची ओळख पटली आहे तर काही मृतदेह अत्यंत वाईट पध्दतीने जळालेले असल्याने, त्यांची ओळख पटलेली नाही. अग्निशमन दलाचे जखमी जवान आणि अधिका-यांवर महापालिका रुग्णालय आणि ऐरोलीच्या नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या चौदा बंबानी अथक प्रयत्नांनी रात्री उशिरा ही आग आटोक्यात आणली.

Leave a Comment