सनी लियोनच्या कपड़याचा लिलाव

पॉर्न स्टार सनी लियोन हिच्या जॉकपट सिनेमाला रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद लाभला आहे. या सिेनमात अभिनेत्री सनीने अतिशय मादक आणि स्टायलिश कपडे परिधान केले आहेत. याच कपड्यांचा दानधर्मासाठी लिलाव करण्यात येणार आहे. कपड्यांच्या लिलावातून जो निधी जमा होईल, त्याचा चॅरिटीकरिता उपयोग करण्यात येणार आहे.

सचिन जोशीची मुख्य भूमिका असेलला ‘जॅकपॉट’ सिनेमा रिलीज झाला आहे. या सिेनेमातील सनीची भूमिका सर्वांना आवडली आहे. या सिनेमात सनीने मादक आणि स्टायलिश कपडे घातले आहेत. तिचे या सिनेमातील कपडे सर्वांना आवडतील असेच आहेत. त्यायमुळेच डयरेक्टार सचिन जोशी यांनी तिच्याआ कपड्यांचा दानधर्मासाठी लिलाव करण्या्चे ठरविले आहे. कपड्यांच्या लिलावातून जो निधी जमा होईल, त्याचा चॅरिटीकरिता उपयोग करण्यात येणार असल्यावचे जोशी यांनी स्पष्ट केले.

या सिनेमात हितेश चोप्रा आणि भक्ती जोशी यांनी सनीसाठी १२ ड्रेस डिझायन केले होते. या प्रत्येक ड्रेसकरिता त्याच्यासारखेच पर्यायी दोन ड्रेस तयार करण्यात आले होते. जेणेकरून, ड्रेस घालताना फाटला किंवा काही अडचण आल्यास दुसरा पर्याय उपलब्ध असावा. आगामी काळात सनीच्या या ड्रेस लिलावाला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment