दिल्लीत सरकार बनवण्याचे केजरीवाल यांचे संकेत

नवी दिल्ली: दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून पडलेला सत्ते‍चा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सरकार बनवण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांना पत्र लिहिले आहे उपराज्यपालांच्या भेटीनंतर केजरीवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

याबाबत बोलताना केजरीवाल म्हनाले, काँग्रेसने आम आदमी पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मात्र आम्हीच त्यांच्यासमोर अटी घातल्या आहेत, असे केजरीवाल यांनी सांगितले आहे. या अटीमध्ये लोकपाल, पाणी, वीज असे प्रश्न ठेवले आहेत. काँग्रेसने आमच्या अटी-शर्थींची पूर्ती केली, तर जनतेसमोर आम्ही प्रस्ताव ठेऊ. यानंतर जनता जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे.

दरम्यान, दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांच्याकडून अरविंद केजरीवाल यांना भेटीसाठी बोलवण्यात आले होतं. आम्ही कोणत्याही पक्षांकडून समर्थन मागितलं नव्हतं. विशेष म्हणजे आम आदमी पार्टीचा जन्मच काँग्रेस आणि भाजपासारख्या पक्षांनी वाढवून ठेवलेल्या भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी झाल्याचे भेटीनंतर केजरीवाल यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.