भाजपने दिली सौरव गांगुलीला खासदारकीची ऑफर

नवी दिल्लील- मास्टर बलास्टा‍र सचिन तेंडूलकर प्रमाणेच आता सौरव गांगुली ही लवकरच खासदार होणार असे दिसत आहे. भाजपने टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला खासदारकीची ऑफर दिली आहे. ही ऑफर स्वीकारायची की नाही, याचा निर्णय गांगुलीने अद्याप घेतलेला नाही. पश्चिम बंगालमध्ये स्पोर्टस आयकॉन असलेल्या गांगुलीला भाजपची सत्ता आल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्रीपद देण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

भाजपने दिलेला हा प्रस्तातव गांगुलीला मिळाल्याचे त्यांनी मान्य केले. याबाबत बोलताना गांगूली म्हपणाला, मला तसा प्रस्तातव मिळाला आहे. परंतु, मी अद्याप निर्णय घेतलेला नाही. इतर कामांमध्येब मी व्यपस्ता आहे. यासंदर्भात लवकरच माहिती देईन.

वरुण गांधी सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजपचे निरिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये पक्षाने नेमकी काय तयारी करावी आणि कोणाला तिकीट द्यावे, यासंदर्भातले धोरण निश्चित करण्याच्या प्रक्रियेत ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सौरव गांगुली आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार वरुण गांधी या दोघांशी चांगली मैत्री असलेली एक व्यक्ती अलिकडेच राजकीय वर्तुळात खूप सक्रिय झाली होती. याच व्यक्तीमार्फत सौरव गांगुली आणि खासदार वरुण गांधी यांची नोव्हेंबर महिन्यात भेट झाली होती. या दोघांच्याव भेटीत भाजपकडून गांगुलीला खासदारकीची ऑफर देण्यात आली असल्याचे समजते.

Leave a Comment