बॉलीवूडची चिकनी चमेली म्हरणून सर्वत्र वेगळी ओळख निर्माण करणा-या अभिनेत्री कैटरिना कैफला आजपर्यंत कोणीच प्रपोज केले नाही असे तिचे म्हणने आहे. त्यामुळे कोणासोबत विवाह करण्याचा प्रयनच येत नाही; असे उत्तर देवून तिने गेल्या काही दिवसांपासून तिच्या विवाहाबाबत मिडीयात पसरलेल्या बातम्या या केवळ अफवा असल्याचे स्प्ष्ट केले आहे.
ब-याच दिवसाच्या चांगल्या कामगिरीनंतर मी आता कुठे बॉलीवूडमध्ये सेट झाले आहे. माझ्या आईने त्यामुळेच मी लवकर विवाह करावा यासाठी काही प्लान केलेला नाही. तसे पहिले तर मला आतापर्यंत कोणीच प्रपोज केले नाही त्यामुळे कोणासेाबत रिलेशनमध्ये असल्याचाही कैटरीनाने यावेळी स्पष्ट शबदात नकार दिला.
पुढे बोलताना अभिनेत्री कैटरिना म्हणाली, गेल्या काही दिवसांपासून मी आगामी काळात येत असलेल्या ‘धूम 3’ च्या प्रमोशनच्या कामात मी आमिर खान सोबत व्यस्त आहे. माझे रितिक रोशन सोबत सुद़धा चांगले संबध आहेत. बॉलीवूडमध्ये आतापर्यंत ऐश्वर्या रॉयने खूप चांगले काम केले आहे. ती खूपच सुंदर आहे. त्यामुळे मी तिची खूप इज्जत करते. त्यामुळे मी कधी ऐश्वर्या सोबत कधीच बरोबरी करीत नाही