‘बिग बॉस’मध्ये केला संग्राम, काम्याने विक्रम

सध्यान सुरू असलेल्या, ‘बिग बॉस’च्या घरात या आठवड्यात भांडणासोबतच एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. बिग बॉसमधील स्पहर्धक काम्या पंजाबी आणि संग्राम सिंह यांनी सर्वाधिक तास एका बॉक्समध्ये राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.या दोन्ही स्पर्धकांनी एका खास टास्कदरम्यान तब्बल ४१ तास एका बॉक्समध्ये घालवले.

काम्या पंजाबी आणि संग्राम सिंह हे करीत असताना विशेष म्हणजे असे करुन या दोघांनीही ‘बिग ब्रदर ६’ या ब्रिटनच्या रिअॅघलिटी शोचा विक्रम मोडित काढला आहे. यापूर्वी या शोमधील स्पर्धक एन्थनी, डेरेक आणि रॉबर्टो यांनी २६ तास एका बॉक्समध्ये राहण्याचा विक्रम केला होता.

‘बिग बॉस’ हा शो बिग ब्रदर या शोवर आधारित आहे. तसे पाहता बिग बॉस हा शो नेहमी त्यात होणा-या वादांमुळे चर्चेत असतो. मात्र या भागात काम्या आणि संग्रामने प्रस्थापित केलेल्या विक्रमामुळे होत आहे. ‘टिकिट टू फिनाले’ या टास्कदरम्यान संग्राम आणि काम्याने हा विक्रम केला. बिग बॉसने तीन स्पर्धकांना म्हणजेच काम्या पंजाबी, संग्राम सिंह आणि अँडीला हा टास्क दिला होता.