अण्णा हजारे यांच्या उपोषणला मनसेचा पाठिंबा

मुंबई- राळेगणसिद्धीतील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपालसाठी सुरू असलेल्याच आंदोलनाला राज ठाकरे यांच्या मनसेने पाठिंबा दिला आहे. याआधी आम आदमी पार्टीचे कुमार विश्वास यांनी भेट घेतली होती. त्यावरून वादंग निर्माण झाला. अण्णांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. आता मनसेने पाठिंबा दर्शवून अण्णांची भेट घेण्याचे ठरविले आहे. मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

लोकपाल विधेयक मंजुरीसाठी केंद्र सरकार राज्यसभेत मांडण्याची शक्यता आहे. लोकपाल विधेयक शुक्रवारी म्हणजे आज चर्चेला आणवे अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, या विधेयकाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने राजकीय रंग प्राप्त होऊ लागले आहेत.

मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेण्याचे निश्चित केले. नांदगावकर राळेगणसिद्धीला रवाना झालेत. याआधी अण्णांनी आपले उपोषण मागे घ्यावे यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली होती. मात्र, अण्णा आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. अण्णांच्या आंदोलनाचा शुक्रवारी चौथा दिवस आहे.
खासगी विधेयकाचा आणि चालू आठवड्याचा अखेरचा दिवस असल्याने लोकपालला आज मुहूर्त मिळतो याबाबत शंका उपस्थित करण्यात येतेय. त्यामुळे हे विधेयक सोमवारी संसदेत मांडलं जाईल, अशीही चर्चा सुरू आहे.

Leave a Comment