नवी दिल्ली – बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने चारा घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर केला आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. दोषी लोकप्रतिनिधींबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार न्यायालयाच्या या निर्णयामळे लालूप्रसाद यादव यांची खासदारकी रद्द झाली. जामीन मंजूर झाल्यालने लालूप्रसाद यादव यांना दिलासा मिळाला आहे.
ऑक्टोंबर महिन्यात रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने चारा घोटाळा प्रकरणात लालूंना दोषी ठरवत त्यांना पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती तसेच २५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. लालूंनी या शिक्षेला रांची उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
यापूर्वी उच्च न्यायालयाने लालूंची याचिका फेटाळून लावल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या घोटाळयात लालूंसह ४४ जणांना सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले होते. मात्र सत्र आणि उच्च न्यायालयाने या घोटाळयात आतापर्यंत लालू वगळता सर्व आरोपींवना जामीन मंजूर केला होता. दोषी लोकप्रतिनिधींबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार न्यायालयाच्या या निर्णयामळे लालूप्रसाद यादव यांची खासदारकी रद्द झाली.