
नवी दिल्ली – काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघातातून थोडक्यात बचावले असल्याचे समजते. मंगळवारी रायबरेलीहून खासगी जेटने दिल्लीला परतत असलेल्या राहुल गांधी यांच्या विमानाला लँडींगची परवानगी दिली गेली होती. मात्र त्याचवेळी राहुल यांचे विमान ज्या रनवे वर लँड होणार होते त्याच रनवेवरून इंडियन एअरफोर्सचे एक विमान उड्डाण करण्याच्या तयारीत होते आणि हे विमान धावपट्टीवरच असताना राहुल यांचे विमान उतरविले जात होते. मात्र वेळीच ही बाब विमान वाहतूक नियंत्रण कक्षातील कर्मचार्यां च्या लक्षात आल्यानंतर त्वरीत राहुल यांच्या वैमानिकाला विमान उतरवू नये असा इशारा दिला गेला. वैमानिकाने तातडीने सूचनेचे पालन केल्यामुळे मोठा अपघात टळला असे समजते.
