प्रेक्षकांनी अभिनय पाहवा- सनी लियोन

मुंबई: एक बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सनी लियॉन हिचे नाव घेतले जाते. गेल्या काही दिवांपासून तिच्याावर हा पडलेला शिक्का तिने पुसण्याचा प्रयत्नन चालविला आहे. आगामी काळात येत असलेल्या‍ सिनेमातून अभिनेत्री सनी लियोन तिच्या बोल्ड अदां ऐवजी अभिनय कौशल्य दाखवणार आहे.

लवकरच सनी लियोनचा ‘जॅकपॉट’ हा सिनेमा येत आहे. यामध्ये चाहत्यांना अंगप्रदर्शन नव्हे तर अभिनय पाहायला मिळणार असल्याचे सनीने म्हटले आहे. पुढे बोलताना सनी म्हणाली, ‘जॅकपॉट एक कहानी प्रधान सिनेमा आहे. ही कहानी वेगाने पुढे सरकते. ही कहानी फक्त माझ्या आकर्षक दिसण्यावर नाही. यावेळी सिनेरसिकांना माझा वेगळा पैलू पाहायला मिळेल, ज्यामध्ये माझा अभिनय वरचढ ठरणार आहे.;

या सिनेमासाठी सनीने खूप मेहनत घेतली आहे. कैजाद गुस्ताद यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सचिन जोशी हा या सिनेमाचा अभिनेता आणि निर्माता आहे. फिल्म शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात दिग्गज अभिनेते नसरुद्दीन शाह यांचीही भूमिका आहे. आगामी काळात येत असलेल्यास या सिनेमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment