रणबीरसोबत लग्न करणार नाही- कैटरिना

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अभिनेता रणबीर कपूर आणि कैटरिना कैफ ही जोडी लवकरच लग्न करणार अशी जोरात चर्चा सुरू आहे. या चर्चेवर स्वता कैटरीना कैफने पाणी फेरले आहे. आगामी काळात मी रणबीरशी ना साखरपुडा करतेय, ना लग्न असे कैटरिनाने सांगून सर्वांनाच बुचकाळयात टाकले आहे. नुकत्याच झालेल्या, एका टीव्ही शोवरील मुलाखतीत कैटरीनाने आपल्या अजब प्रेमाच्या गजब कहाणीवर पडदा टाकला आहे.

रणबीर कपूर व कैटरीनाचे लग्न जमवायाला तयार असलेल्या करिना कपूरच्या उत्साहावर कैटरिनाने पाणी फेरले आहे. मात्र मी रणबीरच्या लग्नात डान्स करायला जरूर आवडेल, असंही कैटरीनाने यावेळी बोलताना स्पाष्टी केले आहे. कैटरीना म्हणाली, ‘मी सध्या कोणाशीही साखरपुडा वा लग्न करत नाही. हे माझं फायनल आहे. माझं लग्न कधी होईल याची कल्पना मला नाही.
आगामी काळात रणबीर कपूरने त्याला जी मुलगी आवडेल तिच्याशी त्याने शुभमंगल करावे.’

रणबीरच्या लग्नात आपल्याला ‘बेशरम’ सिनेमातील गाण्यावर ठेका धरायला आवडेल, असंही कॅटने नमूद केले आहे. याशिवाय करिनाने कतरिनाला भाभी म्हटल्याबाबतचीही विचारणा केली असता, ती मस्करीत बोलली असेल, असे कैटरिनाने स्पष्ट केले.

Leave a Comment