
पणजी – एका महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तेहलका मासिकाचा संस्थापक संपादक तरुण तेजपाल याला गोवा येथील न्यायालयाने १२ दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे. भारतीय दंडविधानाच्या विभिन्न कलमांतर्गत तेजपाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आज (बुधवार) त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपणार होती. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. गोव्यामधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ७ व ८ नोव्हेंबर रोजी तेजपाल याने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यावेळी तेहलकामध्ये काम करत असलेल्या महिला पत्रकाराने केला होता.
