पुणे, – व्यक्तीच्या आयुष्यात विवाहाचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्णअसतो. आपली रेशीमगाठ एखाद्या हटके दिवशी जुळावी आणि तो दिवस सर्वांच्याच स्मरणात रहावा यासाठी वधु वरांबरोबरच आप्तस्वकीयही िवशेष प्रयत्न करताना दिसून येतात. जर ती तारीख हजार वर्षातून एकदा आली असेल तर ती पर्वणीच ठरते. यंदाही डिसेंबरची ११-१२-१३ ही तारीख गाठण्यासाठी अनेकांनी धावपळ सुरू केली आहे.
हजार वर्षातून एकदा येणारी ११-१२-१३ ही तारीख लग्नाचा मुहूर्त म्हणून गाठण्यासाठी विवाहेच्छुकांच्या नातेवाईकांनी मोठा आटोकाट करून ही मुहुर्त साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. हा लग्नाचा दिवस हयातभर लक्षात राहण्यासाठी वधू-वर उत्सुक आहेत. या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या वर्षातील ३४५ वा दिवस आहे यामुळे ३-४-५ असाही योग साधला जाणार आहे.
ज्योतीश व खगोलशास्त्रानुसार या दिवशी कोणत्याही प्रकारचा विशेष मुहूर्त नसला तरी साखरपुडा, लग्नसोहळा व इतर कार्यक्रम करून हा दिवस आपल्या आयुष्यात संस्मरणीयकरण्याचा प्रयत्न काहीजण आवर्जून करीत आहेत. दरम्यान २००१ पासून सुरू असलेला १-१-१, २-२-२, मागील वर्षीचा १२-१२-१२ या तारखांचे लग्न मुहूर्त साधण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. या क्रमवारीत येणारा ११-१२-१३ हा शेवटचा हटके मुहुर्तआहे. यामुळे यंदाही या मुहर्तावर अनेकजण विवाह बंधनात अडकण्यास उत्सुक आहेत.