आरटीओ अरूण येवला यांची बदली – मुख्यमंत्र्याच्या नावे रिक्षा परवाना प्रकरणाचा परिणाम

पुणे – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावे रिक्षा परवाना काढण्यात आल्याची बाब नुकतीच उघडकीस आली होती. त्यामुळे प्रादेिशक परिवहन कायर्ालयातील (आरटीओ) सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. याची दखल घेऊन प्रादेशिक परिवहन अिधकारी अरुण येवला यांची मुंबईयेथील परिवहन आयुक्त कार्यालयात उपायुक्त पदावर शनिवारी बदली करण्यात आली.

आरटीआ कार्यालयातील सावळ्या गोंधळामुळे चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावे रिक्षा परवाना काढण्यात आला. ही गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे संगणकाचा पासवर्ड माहीत असणार्‍या तीन कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात आली. त्यातील एकास निलम्बित करण्यात आले.

दोघांची अद्यापही चौकशी सुरु आहे. तसेच आरटीओतील पाच दिवस कामकाज बंद ठेऊन संगणक प्रणालीत बदल करण्यात आला. मात्र एकुणच प्रकरणात आरटीओ कार्यालय आनि मुख्यमंत्री यांच्या नावे असणारा परवाना यावरुन मोठ्या प्रमाणात चर्चाझाली. या एकुणच प्रकाराची चौकशी सुरुअसली, तरी आरटीओ कार्यालयातील सावळा गोंधळामुळे चक्क मुख्यमंत्र्यांना त्याचा फटका सहन करावा लागला. त्यामुळे या प्रकरणास मुख्य परिवहन अिधकारी यांनाच जबाबदार धरून, त्यांची बदली करण्यात आली असल्याचे समजते.

Leave a Comment