दादरला हेरिटेज दर्जा देण्यापेक्षा विक्रांत वाचवा- राज ठाकरे

मुंबई – दादरला हेरिटेज दर्जा देण्यापेक्षा विक्रांत वाचवण्यावर भर द्या, असा सल्ला आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे. ते मुंबईतील एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

71च्या युद्धात अतुलनीय कामगिरी बजावणारं आयएनएस विक्रांत हे नौदलाचं विमानवाहू जहाज भंगारात काढण्याचा सरकाराचा प्रयत्न आहेत. या जहाजाने युद्धात बजावलेली कामगिरी बघता या जहाजाचं संग्रहालय करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यालाच प्रतिसाद देताना राज ठाकरे यांनी हे विधान केले आहे. मात्र, आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असा विश्वासही राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

दादर, शिवाजी पार्कला हेरिटेजचा दर्जा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र त्याला मनसेसह शिवसेनेचा विरोध आहे. राज ठाकरे यांचे कृष्णकुंज निवासस्थान याच परिसरात येत असल्याने हेरिटेजचा दर्जा देण्यास मनसेचा विरोध आहे.

Leave a Comment