संजय दत्तला पून्हा 30 दिवसांचा पॅरोल

पुणे: संजय दत्त यांस पुन्हा दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे. पत्नीची प्रकृती बरी नसल्याने त्याला हा पॅरोल मंजूर करण्यात झाला आहे. दरम्यान,संजय दत्तला गेल्या 1 ऑक्टोबरला प्रथम 14 दिवसांची व त्यानंतर आजारपणाच्या कारणामुळे आणखी 14 दिवसांची वाढीव रजा मिळाली होती.

28 दिवसांची संचित रजा व येण्या-जाण्याचे दोन दिवस असे 30 दिवस सुटी मिळाली होती. त्यानंतर आज पुन्हा कारागृह प्रशासनाने संजय दत्तची पत्नी मान्यता हिची प्रकृती बरी नसल्याने त्याला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे.