
पुणे : अवकाळी पावसामुळे बदलेल्या हवामानाचामटका कोक़ण आणि कर्नाटकातील आंब्याच्या पिकावर झाला आहे. पावसामुळे आंब्याचे पिक विलंबाने येणार आहे. नागरिकांना आंब्याची चव चाखण्यास आणखीमहिनाभर तरी वाट पाहावी लागणार आहे.

पुणे : अवकाळी पावसामुळे बदलेल्या हवामानाचामटका कोक़ण आणि कर्नाटकातील आंब्याच्या पिकावर झाला आहे. पावसामुळे आंब्याचे पिक विलंबाने येणार आहे. नागरिकांना आंब्याची चव चाखण्यास आणखीमहिनाभर तरी वाट पाहावी लागणार आहे.
कोक़णातील रत्नागिरी, राजापूर, पावस, गणपती पुळे, देवगड या भागातून आणि कर्नाटकातून येथे आंब्याची आवक होत असते. गेल्या वर्षी दिवाळीतच आंब्याची आवक झाली होती.मात्र,मागील काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे हवामान बदलले आहे. वातावरणातील थंडी गायब झाली आहे. थंडी अभावी आंब्याच्या झाडांनामोहोर कमी आणि विलंबाने लागत आहे. कोक़णातील काही ठिकाणी झाडांनामोहोरही लागला होता.मात्र, पावसामुळे तोमोहोर गळाला आहे. आता तेथे नव्याने हळूहळूमोहोर येण्यास सुरूवात झाली आहे. पिक येण्यास काही कालावधी लागेल. त्यामुळे कोक़णातील आंब्याचे पिक लांबणार असल्याचीमाहिती व्यापारी गोरख कामठे आणि करण जाधव यांनी दिली.
कर्नाटकातून येथेमोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत असते. तुलनेने कर्नाटकचा आंबा कोकणातील आंब्यापेक्षा स्वस्त असतो. त्यामुळे नागरिक कर्नाटकच्या आंब्याची वाट पाहत असतात.मात्र, यंदा कर्नाटकातील परिस्थिती वेगळीच आहे. कर्नाटकातील अवकाळी पाऊस नुकताच थांबला आहे. आंब्याच्या झाडांना आतामोहोर लागण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कर्नाटकातील पिक लांबणार आहे, अशीमाहिती व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.