नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानानंतर काही संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणाचे अंदाज आता तपशिलात पुढे आले असून सत्ताधारी कॉंग्रेस पक्ष तिथे तिसर्या क्रमांकावर राहील असे या सर्वेक्षणामध्ये दिसून आले आहे. एक्झिट पोलनंतर या संस्थांनी एक वेगळ्या प्रकारचा मतदानोत्तर सर्व्हे केला तेव्हा कॉंग्रेस पक्षाची अवस्था अतीशय दयनीय होणार असल्याचे धक्कादायक निष्कर्ष हाती आलेले आहेत.
दिल्लीत कॉंग्रेस तिसर्या क्रमांकावर
या सर्वेक्षणानुसार दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ३२ ते ४२ जागा भारतीय जनता पार्टीला, १३ ते २१ जागा आम आदमी पार्टीला तर ९ ते १७ जागा कॉंग्रेसला मिळणार आहेत. झालेल्या मतदानापैकी ३३ टक्के मते भाजपाला २७ टक्के मते आम आदमी पार्टीला तर २३ टक्के मते कॉंग्रेसला पडणार आहेत. बसपाला ८ टक्के मते पडण्याची तर अन्य उमेदवारांना ९ टक्के मते पडण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत प्रथमच मतदान करणार्या तरुण मतदारांमध्ये आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल हे अधिक लोकप्रिय असल्याचे दिसून आले. या मतदारांपैकी ३९ टक्के मतदारांनी अरविंद केजरीवाल यांना मतदान केले आहे. तर २७ टक्के मतदारांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केले आहे. या तरुण मतदारांपैकी केवळ १७ टक्के मतदार कॉं्रग्रेसच्या बाजूचे आहेत.
दिल्लीतील मतदारांची संख्या १ कोेटी १९ लाख आहे. त्यात ४ लाख मते प्रथम मतदान करणार्या तरुण मतदारांची आहे. एकूण मतदान ७८ लाख झालेले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आजपर्यंत ६१ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते. १९९३ सालचा विक्रम यावर्षीच्या मतदानाने मोडला आहे आणि यावेळी ६६ टक्के मतदान झाले आहे.
