पुणे : कथा, कादंबरीचे चित्रपटात रूपांतर होताना माध्यमाची आवश्यकता म्हणुन काही बदल होत असतात. अनेक वेळेलामाध्यमांतर करण्याचा प्रयोग यशस्वी होत नाही असे दिसते.माध्यमांतर यशस्वी होण्यासाठी दिग्दर्शकाने लेखकाच्या नेमक्या भावना समजून घेणे महत्वाचे असते असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखीका सुधामुर्ती यांनी शुक्रवारी केले.
मुर्ती यांच्या ऋण या कानडी कथेवरील पितृऋण हा चित्रपट आज प्रदर्शित झाला, त्यानिमित्त आयोजीत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. दिग्दर्शक नितिश भारद्वाज, निर्माते श्रीरंग गोडबोले यावेळी उपस्थित होते.
मुर्ती म्हणाल्या,मी अनेक कथा, कादंबर्या लिहिल्या आहेत.मात्रमाझ्या कथेवर कधी चित्रपट निघेल असेमला वाटले नव्हते. भारद्वाज यांनी माझ्याकडे हा प्रस्ताव आणला त्यावेळी त्यांच्या माध्यमातून माझ्या भावना लोकांपर्यंत पोहचणार आहेत याची मला शास्वती वाटली म्हणून मी त्यांच्या पटकथेला होकार दिला. माझ्या साहित्यावर चित्रपट निघाल्याचामला आनंद असला तरी माझ्या भावना दिग्दर्शक नेमकेपणाने प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी सक्षम आहे, तशी त्याने पटकथामला ऐकवली तरच मी माझ्या साहित्याचे माध्यमांतर करण्याची परवानगी देइन.
पुण्यात असताना अनेक मराठी चित्रपट पाहिले आहेत मला आजही मराठी चित्रपटांची विषयी आकर्षण आहे, मात्र माझ्याकडे तितकासा वेळ नसतो तरीहीमी चांगल्या कलाकृतीविषयी जाणुन घेण्यास उत्सुक असते. एका कन्नड चित्रपटातमी छोटीसी भूमिका केली तेंव्हा अभिनयापेक्षा लिखाण सोपे असल्याची जाणीव झाल्याचे मूर्ती यांनी सांगितले.