संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू

नवी दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र, हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत. एनडीएची बुधवारी बैठक झाली या बैठकीत तेलंगणामध्ये दोन अधिक जिल्हे जोडण्यास एनडीएन तीव्र विरोध करणार आहे. काँग्रेस महिला आरक्षण बिल आणि बढतीमध्ये आरक्षण बिल पास करण्याच्या तयारीत आहे. मात्र, समाजवादी पार्टी महिला आरक्षण बिलाला विरोध करणार आहे.

संसदेचं हे सत्र केवळ १२ दिवसांचे आहे आणि भरपूर सारे मुद्दे आहेत. यामुळेच सरकारसमोर कोणती बिल पास संमत करायची, हे एक आव्हानच ठरणार आहे. कॉग्रेसच्या पक्षध्यक्षा सोनिया गांधी यांच्यादृष्टीने महत्त्वाचे असलेल महिला आरक्षण बिलही या सत्रात मांडले जाणार आहे. पण, समाजवादी पार्टीनं या बिलाला सरळ सरळ विरोध असल्याचे जाहीर केल आहे.

संसदेचे हे हिवाळी अधिवेशन ५ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या हिवाळी अधिवेशनात १२ बैठका होणार आहेत. यादरम्यान ३८ विधेयक संसदेत मांडले जातील. ८ डिसेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकालही स्पष्ट होतील. त्याचा प्रभावही या अधिवेशनावर पडण्याची चिन्ह आहेत.