शाहरुख खान मुलांना घेवून जाणार पेशावरला

सुपर स्टार शाहरुख खान याचे पाकिस्तनमधील पेशावर शहराशी जवळचे नाते आहे. त्यामुळे आगामी काळात अभिनेता शाहरुख खान त्यााच्या तिन्ही मुलांना म्हाणजेच आर्यन, सुहाना आणि अबरामला पेशावरला घेवून जाणार असल्यायचे समजते. त्याच्या कुटुंबाचा पूर्वीपार संबंध पेशावर शहराशी असल्याने तो याठिकाणी भेट देणार असल्याचे समजते.

अभिनेता शाहरुखने पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी दिलेले पाकिस्तानात यायचे आमंत्रण स्वीकारले आहे. याबाबत बोलताना शाहरुख म्हणाला, “मी लहान असतांना माझे वडील मला तिकडे घेऊन गेले होते, तिथं जायला मला आवडेल. माझे मुळ कुटुंब पेशावरचे आहे आताही काही नातेवाईक तिथंच राहतात. मला पेशावरला जायला आवडेल विशेष म्हणजे मुलांना घेऊन, कारण मी १५ वर्षांचा असतांना माझे वडीलही मला तिथं घेऊन गेले होते, त्यानंतर त्यांचं निधन झालं. त्यावेळच्या आठवणी आजही माझ्या मनात आहेत.”

शाहरुख खानचा जन्म भारतात झाला असला तरी त्याचे वडील ताज मोहम्मद खान यांचा जन्म पेशावरमध्ये झाला होता. ते त्यांच्या काळातले सर्वात तरुण स्वातंत्र्य सैनिक होते.
दोन्ही देशांमधला तणाव कमी झाला पाहिजे, दोन्ही देश मित्र व्हायला हवे, असं शाहरुख म्हणतो. ४८ वर्षीय शाहरुख नुकताच तिस-या मुलाचा बाप झाला आहे.

Leave a Comment