राजकारणात येणार नाही – आमीरखान

मुंबई – मी कलाकार आहे. कलेच्या माध्यमातूनच मी समाज परिवर्तनासाठी कार्य करू इच्छीतो. राजकारणात येण्याचा माझा अजिबात बिचार नाही असे परफेकशनिस्ट म्हणून ओळख असलेल्या बॉलिवूड अभिनेता आमीरखान याने स्पष्ट केले आहे.

अर्थात तो राजकारणात येणार नसला तरी प्रत्येक माणसाने राजकारण आणि सामाजिक परिस्थिती याबाबत जागरूक असले पाहिजे असेही तो सांगतो. सर्वसामान्य जनता जेव्हा जागरूक असेल तेव्हाच देशातील परिस्थितीत बदल घडविणे शक्य आहे , पूर्ण देशात बदल घडवायचा तर जनतेनेच जागे व्हायला हवे असे सांगताना त्याची कोणाशीही स्पर्धा नाही आणि दुसर्‍याने चांगले काम केले तर आनंदच वाटतो असेही तो म्हणाला. एका टिव्ही शो मध्ये आमीरने आपली ही मते व्यक्त केली आहेत.

Leave a Comment