गेल्या काही दिवसांपासून सलमान आणि आमिरची मैत्री वाढली आहे. सलमानला अमिरबद़दल आदर आणि प्रेम आहे. वेळोवेळी संधी मिळाल्यानंतर आमिरवरचे प्रेम व्यक्त करण्याची संधी तो दवडत नाही. त्यामुळे ‘धूम ३’ सिनेमातील साहिलच्या भूमिकेसाठी आमिरने वापरलेली टोपी घालून सलमान ‘बिग बॉस’मध्ये अवतरला. त्या सोबत सलमानने अमिरवर असलेले प्रेम पुन्हा एकदा जाहीर केले आहे.
आमिरने आगामी काळात येत असलेल्याल ‘धूम ३’ या सिनेमासाठी ‘बोलर टोपी’ म्हणून ओळखली जाणारी टोपी वापरली आहे. ती त्याची ओळख बनली आहे. त्यामुळे शुटिंगला सुरूवात झाल्यानंतर आमिर जिथे जाईल तिथे तीच टोपी घालून फिरत असतो. एवढेच नाही तर ‘धूम ३’ मध्ये वापरलेल्या ज्या ज्या गोष्टींचे मर्केडायझिंग सुरू आहे त्यात आमिरची टोपी खास ‘धूम’ ब्रँडेड म्हणून विकण्यात येत आहे.
आमिरची ही टोपी लोकप्रिय करण्यासाठी सलमानने आता ती आपल्या डोक्यावर घातली आहे.
सलमानने ‘बिग बॉस’ च्या सेटवर ही टोपी घालून प्रवेश केल्याबरोबर सगळ्यांनाच कमाल वाटली. आमिर आणि सलमानच्या मैत्रीचे किस्से सगळ्यांना माहिती असले तरी इतक्या उघडपणे आपली मैत्री व्यक्त करण्याची कमाल फक्त सलमानच करू शकतो. ‘मैने प्यार किया’ सिनेमात सलमानने वापरलेली निळ्या रंगाची ‘फ्रेंडशीप’ लिहिलेली टोपीही त्यावेळी लोकप्रिय झाली होती. त्या्मुळे आगामी काळात सलमानमुळे हे टोपी सुध्दा लोकप्रिय ठरेल असे वाटते.