राणे समर्थकांचा मुंबईत धुडगूस

मुंबई – ‘राणे’ समर्थक गुंडांनी मुंबईत मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी धु़डगूस घातला. विशेषता या गुंडानी मुंबईहून गोवा आणि पुण्याकडे जाणा-या बसेस या व्यक्तींनी टार्गेट करीत तोडफोड केली आहे. ही तोडफोड ‘राणे’ समर्थक गुंडांनी केली असल्याचे येथील काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. पोलिसांकडून त्याडची चौकशी सुरू आहे. मात्र, या घटनेचा संबंध मंगळवारी नितेश राणे यांना गोव्यात झालेल्या अटकेशी जोडला जात आहे.

बोरीवलीमध्ये खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेसचीही तोडफोड करण्यात आली तर दुसरीकडे काही व्यक्तींनी जुहू येथील गोवा भवनला ही लक्ष्य केले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते तोडफोड करणा-या व्यक्ती हातात एका राजकीय पक्षाचे झेंडे हाती घेऊन आले होते. ही तोडफोड नेमकी कुणी केली? याचा पोलीस अजून तपास करत आहेत त्यामुळे त्यांनी कोणत्याही पक्षाचे सरळ सरळ नाव घेणे टाळले आहे. मात्र, या घटनेचा संबंध मंगळवारी नितेश राणे यांना गोव्यात झालेल्या अटकेशी जोडला जात आहे.

टोल देण्यास नितेश राणेंनी नकार दिल्यानंतर गोव्यात राडा झाला होता. नितेश यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते सिंधुदुर्गतून गोव्यात जात होते. त्यांना रस्त्यात कलंगूट टोलनाक्यावर टोलसाठी अडवले. मात्र, आपण नारायण राणेंचे पुत्र आहोत, अशी धमकीवजा सुचना त्यांनी टोल कर्मचा-यांना दिली. पण, गाडी सरकारी नसल्यामुळे त्यांना टोल कर्मचा-यांनी गाडी सोडण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या नितेशच्या बॉडी गार्ड्सनी कर्मचा-यांना मारहाण केली होती.

Leave a Comment