मनोहर जोशी लागले राज्य सभेच्या तयारीला

मुंबई- नाराजीबाबत माफीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी पुन्हा एकदा ते ‘अॅक्टिव्ह’ झाल्याचे दिसून येत आहे. जोशी सरांनी राज्यसभेच्या सातव्या जागी आपल्याकडे पुरेसे संख्याबळ नसले तरी सेनेचा उमेदवार जिंकून येवू शकतो, याबाबत उद्धव यांना माहिती दिली. याबाबत त्यांनी गणिती भाषेत संख्याबळाबाबत आकडेमोड करून दाखविली. त्यानंतर जर तुम्हाला हे असे होईल व घडेल असे वाटत असेल तर तुम्ही तयारी करा, सेना तुम्हाला सातव्या जागेसाठी पाठिंबा देईल, असे उद्धव यांनी जोशींना सांगितल्याचे सूत्रांकडून कळते.

त्यामुळे बुधवारी मनोहर जोशी यांनी सकाळी गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची अहमदबाद येथे भेट घेतली. या भेटीचा तपशील मिळाला नसला तरी फेब्रुवारीत राज्यातील राज्यसभेच्या सातव्यात जागांसाठी निवडणुका होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचे कळते.

सातव्या जागेसाठी शिवसेनेकडे आवश्यक संख्याबळ नाही. त्यामुळे जोशींनी काही संख्याबळाचे गणिते मांडली असून, त्यांनी याबाबत उद्धव यांनाही माहिती दिली आहे. त्यामुळे उद्धव यांनी तुम्हाला तसे वाटत असेल तुम्ही चाचपणी व जुळवाजुळव सुरू करू शकता, असे सांगितल्याचे कळते. तसेच राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी सेनेने जोशींना तुम्ही इच्छुक असाल आणि तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर पाठिंबा देण्याची तयारी दर्शिवली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Leave a Comment