अनुष्का शर्मा व विराट कोहलीच्या प्रेमाची चर्चा

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अनुष्का शर्मा व क्रिकेटर विराट कोहली यांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र जोमात सुरू आहे. या दोघांबद्दल चर्चेमुळे त्यांच्यात नक्कीच काही ना काही सुरू असल्याचे समजते आहे. आता तर, दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर जाण्याआधी रविवारी रात्री विराट कोहलीला अनुष्कासोबत काही जणांनी पाहिले आहे. एवढेच नव्हे तर यावेळी या दोघांनी एकमेकांना ‘किस’ही केल्याची बातमी आहे. त्यामुळे आता या दोघांच्या प्रेमाची चर्चा चांगलीच रंगली आहे.

सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री जवळपास पावणे अकराच्या सुमारस विराट आणि पार्किंग एरियामध्ये होते. अनुष्कानं थोड्या ब्राईट रंगाचा टी शर्ट आणि गुलाबी ट्राऊजर परिधान केली होती तर विराट कॅज्युअल ड्रेसमध्ये होता. अनुष्काने विराटला निरोप दिला पण, त्यापूर्वी दोघांनीही एकमेकांचे कीस घेतले. अगोदर अनुष्काने विराटला ‘किस’ केले आणि नंतरही विराटनंही संधी साधली. दोघंही खूप आनंदी दिसत होते. आणि जेव्हापर्यंत कार पार्किंग एरियामधून निघाली नाही तेव्हापर्यंत विराट पाठिमागे वळून वळून अनुष्काला पाहतच होता.

यापूर्वीही, विराट आणि अनुष्काला काही जणांनी गेल्या महिन्यात कारमध्ये पिफरताना पाहिलं होते. सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा केव्हा विराट मुंबईत येतो तेव्हा तो अनुष्काला तिच्या घरी भेटण्यासाठी नक्की जातो. अनुष्का आणि विराटची भेट एका शॅम्पूच्या जाहिरातीत एकत्र काम करताना झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये चांगलीच जवळीक निर्माण झाल्याची चर्चा जोरात सुरू असून दोघेपण एकमेकांच्याच प्रेमात पडले असल्याची चर्चा आहे.

Leave a Comment