आयएनएस विक्रांतचा या महिन्यात लिलाव

मुंबई – देशाची पहिली विमानवाहू नौका आयएनएस विक्रांतचा या महिन्यात लिलाव केला जाणार असल्याचे  वेस्टर्न नेव्हल कमांडचे व्हाईस अॅडमिरल शेखर सिन्हा यांनी सांगितले. अर्थात ही नौका जतन केली जाणार की ती भंगारात काढली जाणार हे अजून नक्की नाही. मात्र  जी कंपनी ही नौका विकत घेईल त्यांना जर तिचे जतन करून संग्रहालय करायचे असेल तर नेव्हीकडून सर्वतोपरी सहाय्य केले जाणार आहे.

ही नौका १९९७ पासून ताफ्यातून बाद करण्यात आली आहे. त्यानंतर तिचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले होते. कांही काळापूर्वी महाराष्ट्र शासनाने या नौकेचा देखभाल खर्च परवडत नसल्याचे कळविल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने ती लिलावात विकण्याचा निर्णय घेतला असे सांगून सिन्हा म्हणाले की कांही कंपन्यांनी ही नौका खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे. नौकेची किमान किमत नक्की करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.