मंगळयानाने चंद्राची कक्षा ओलांडली

चेन्नई – भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या अर्थात इस्त्रोच्या मंगळयानाने कालच पृथ्वीच्या गुरुत्वाकक्षेतून यशस्वीरित्या बाहेर पडल्यानंतर चंद्राची कक्षाही ओलांडली आहे. इस्त्राने पीटीआला दिलेल्या माहितीनुसार, हे यान प्रतिदिन सुमारे 10 लाख कि.्रमी.चा प्रवास करत आहे. मंगळयानाने चंद्रयानाची कक्षा ओलांडल्यानंतर चंद्राचीही कक्षा ओलांडली आहे. आता हे यान चंद्राच्याही पलीकडे मंगळाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

ते दिवसाला 10 हजार कि.मी.चा पवास करत आहे. त्यामुळे, स्वदेशी बनावटीचे यान प्रथमच अंतराळात एवढया दूरपर्यंत पोचले आहे. रविवारी या यानाने पृथ्वीच्या कक्षेबाहेर प्रवास सुरु केला. सुमारे 300 दिवसानंतर हे यान मंगळावर पोचणार आहे. रविवारी रात्री सूर्याच्या नियोजित कक्षेत हे यान जाण्याचे महत्वपूर्ण कार्यही पार पडले. इस्त्रोच्या प्रक्षेपण केंद्रातून या यानावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

Leave a Comment