एलिझाबेथ राणीपेक्षा सोनिया गांधी श्रीमंत

नवी दिल्ली – ब्रिटनमधील एका वेबसाइटने केलेल्या पाहणीनुसार जगातील श्रीमंत राजकारण्यांच्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा समावेश केला आहे. इंग्लंडची राणी एलिझाबेथ द्वितीय आणि सिरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांनाही या यादीत सोनिया गांधी यांनी मागे टाकले आहे. ङ्गहफिंग्टन पोस्ट वर्ल्डफ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या श्रीमंत राजकारण्यांच्या यादीत सोनिया गांधी यांचा क्रमांक 12 वा आहे.

सन 2009 मध्ये लोकसभेची उमेदवारी दाखल करताना दिलेल्या शपथपत्रानुसार सोनिया गांधी यांच्याकडे स्वतःची कार आणि भारतात घर देखील नाही. मात्र, श्रीमती गांधी यांच्या मालकीचे इटलीमध्ये प्रशस्त घर असून त्याची किंमत 182 लाख रुपये आहे. सोनिया गांधी यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 1.38 कोटी रुपये आहे. याच शपथपत्रानुसार त्यांच्याकडे 75 हजार रुपये रोख आणि 28.61 लाख रुपये बँकेत मुदत ठेवींच्या रूपात आहेत. त्यांच्याकडे भारतीय रिझर्व्ह बँकेचे 20 लाख आणि 12 लाख रुपयांचे बाँड आहेत.

पोस्टाच्या ठेव योजनेत सोनिया गांधी यांनी 1 लाख 99 हजार रुपये गुंतवले आहेत. पीपीएफमध्ये 24.88 लाख रुपयांची ठेव आहे. सोनिया गांधी यांच्याकडे 2.5 किलो सोने 88 किलो चांदी आहे. आम आदमी पक्षाच्या (आप) देणगीवर नजर ठेवणार्‍या काँग्रेसने त्यांनाही देणगी कोठून आणि किती मिळते, हे उघड करावे असे आव्हान ङ्गआपफचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वीच दिले आहे.