सिनेमा नाकरल्याचे दुःख नाही- करीना

बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी करिना कपूर एक आहे. गेल्यान काही दिवसांपासून करीनाचे सिनेमे बॉक्स ऑपिफसवर फारशी कमाल दाखवू शकलेले नाहीत. गेल्या काळात तिने काही मोठया बॅनरेचे सिनेमे नाकारले आहेत. तिने सोडलेले काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर गाजले आहेत. मात्र याबाबत कसलेच दुःख होत नसल्याचे मत करिनाने व्यक्त केले आहे.

याबाबत अधिक बोलताना अभिनेत्री करिना म्हणाली, ‘आतापर्यंत मी काम केलेल्या सिनेमापेक्षा नाकारलेल्या सिनेमाची संख्या जास्त आहे. मी असे कित्येक सिनेमे नाकारून दुस-यांच्या झोळीत टाकले आहेत. मला वाटत मी वेडी आहे. मला नाही आवडला तर मी त्या सिनेमात काम करत नाही. मी घरी राहून पार्टी करते किंवा प्रवासास जाते. पण अशा सिनेमात काम करण्याळस नकार देते.’

गेल्या काही दिवसांतच करिनाने ‘राम लीला’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘फॅशन’, ‘पेज ३’, ‘कल हो ना हो’ यांसारखे ब्लॉकबस्टर सिनेमे नाकारले आहेत. नाकारलेल्या सिनेमातील काही सिनेमे सुपरहिट झाल्याचे मला दुःख नाही. मला जीवनात मागे वळून पाहायला आवडत नाही, यापूढे कधी मी मागेवळून देखील पाहणार नाही, असेही करिनाने यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Leave a Comment