टीम इंडिया आफ्रिका दौ-यासाठी रवाना

मुंबई: वेस्ट इंडिजला घरच्या मैदानात धूळ चारल्यानंतर दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी रविवारी मध्यरात्री टीम इंडिया रवाना झाली आहे. कर्णधार महेद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडिया साऊथ आफ्रिकेमध्ये तीन वनडे आणि दोन सामने खेळणार आहे. या सामन्याआपूर्वी टीम इंडिया या ठिकाणी जावून वातावरणाशी जुळते घेणार आहे.

नुकत्याच प्रसिद़ध झालेल्या आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियाने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. कसोटी क्रमवारीत भारताच्या खात्यात ११९ गुण असून, अव्वल स्थानावरच्या दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात सर्वाधिक १३१ गुण आहेत. दक्षीण आफ्रिकेतील दोन्ही सामने टीम इंडियाने जिंकले तरी त्यांना अव्वलस्थान गाठता येणार नाही.

सलग सहा मालिका जिंकणा-या भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर चाहत्यांनी अभिनंदन केले आणि आफ्रिका दौ-यासाठी शुभेच्छाही दिल्या. त्‍यामुळे आगामी काळात होत असलेल्याे मालिकेत टीम इंडियाच्या कामगीरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.