पणजी – गोव्याच्या सत्र न्यायालयाने तरुण तेजपाल यांना सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. गेल्या शनिवारी त्यांना बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. काळ्या सूटमध्ये आलेल्या तरुण तेजपाल यांना कपडे बदलून कोठडीत पाठविण्यात आले. आता येते सहा दिवस त्यांची कसून तपासणी केली जाईल.
गेल्या शुक्रवारी रात्री एका पंचतारांकित हॉटेलमधील महागड्या खोलीमध्ये उतरून आलिशान सोयींसह मुक्काम केलेल्या तेजपाल यांना आता याच ठिकाणी पोलिसांच्या पहार्यात यावे लागेल आणि तिथे त्यांनी केलेल्या कामलीलांची माहिती पोलिसांना द्यावी लागेल. गेल्याच आठवड्यात हे गृहस्थ अमिताभ बच्चन यांच्या सोबत वावरत होते. आता त्यांना पोलीस अधिकार्यांच्या सोबत जावे लागेल.
पणजीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्षमा जोशी यांनी तेजपाल यांना कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला. आता पोलीस निरीक्षक सुनिता सावंत त्यांची चौकशी करतील. क्षमा जोशी यांनी तेजपाल यांचा जामीन अर्ज ङ्गेटाळण्याचा निर्णय दिला तेव्हा पत्रकारांना आपल्या कक्षात येण्याची मनाई केली होती. मात्र त्यांनी पत्रकारांना तेजपाल यांस पोलीस कोठडीत जाताना प्रश्न विचारण्याची परवानगी पत्रकारांना दिली.