सलमानच्या ‘जय हो’ मध्ये जेनलिया

बॉलीवूडमधील प्रसिदध अभिनेत्री जेनेलिया देशमुख ‘जाने तू या जाने ना’, ‘तेरे नाल लव्ह हो’ गया या सिनेमात काम केल्यानंतर ही सिनेमातून गायब झाली होती. आता आगामी काळात सलमान खानच्याा ‘जय हो’ या सिनेमातून ती पाहुणी कलाकार म्हणून या सिनेमातून झळकणार आहे. त्यामुळे आगामी काळात येत असलेल्यात या सिनेमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात येत असलेल्याम सलमानच्या ‘जय हो’ सिनेमाच्या माध्यामातून ती बॉलीवूडमध्ये पुर्नपदार्पण करणार आहे. पण, यात ती मुख्य भूमिका साकारणार नसून, केवळ पाहुणी कलाकार म्हणून सिनेमात झळकणार आहे.

‘जय हो’ मध्ये ती छोटी पण महत्वाची भूमिका साकारणार असून, सलमानच्या बहिणीच्या रुपात ती यात दिसेल. सिनेमाच्या सुरुवातीच्या काही दृश्यांमध्ये तिचे काम आहे. त्यानंतर तिचा मृत्यू होतो, असे सिनेमात दाखविण्यात येणार आहे.

आगामी काळात येत असलेल्या या सिनेमात सलमानसोबत अभिनेत्री तबू, सना खान, अश्मित पटेल आणि सुनील शेट्टी यांच्याही भूमिका आहे. सलमानच्याम सिनेमातून जेनलिया काम करणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.