
श्रीहरीकोटा: मंगळयानाला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढून मंगळाच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. भारताने शनिवारी आपल्या मंगळ मोहीमेतला आणखी एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे.

श्रीहरीकोटा: मंगळयानाला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढून मंगळाच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. भारताने शनिवारी आपल्या मंगळ मोहीमेतला आणखी एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे.
शनिवारी मध्यरात्री १२ वाजून ४९ मिनिटांनी इस्त्रोच्या नियंत्रण कक्षातून आदेश देऊन मंगळयानाच्या ४४० न्यूटन इंजिनाला सुमारे २२ मिनिटे आठ सेंकंदाने सुरु करण्यात आले. याद्वारे यानाला पृथ्वीच्या कक्षातून सूर्याच्या कक्षेत हलवण्यात आले. रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी मंगळयानाची दिशा बदलली होती, जेणेकरुन त्याची कक्षा बदलण्यात येईल, असे इस्त्रोतर्फे सांगण्यात आले.
पुढील तिनशे दिवसांच्या याज्ञेत यानाला सूर्याच्या कक्षेत त्याठिकाणी नेलं जाईल जिथे मंगळाच्या कक्षेला मिळते. त्यानंतर यानाला मंगळाच्या कक्षेत सोडण्यात येईल. यान मंगळाच्या कक्षेजवळ येताच प्रज्वलनाचा वेग कमी करून यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल. यानाची लिक्वीड एपोजी मोटार प्रज्वलित करुन यानाचा प्रवास सप्टेंबर २०१४ पर्यंत सुरु राहिल. याआधी ५ नोव्हेंबरला प्रक्षेपणानंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेत फिरत होते. सध्या यानाचे कार्य इस्त्रोच्या नियोजनानुसार सुरू असल्याचे मंगळ यान प्रकल्पप्रमुख एम. अन्नादुराई यांनी म्हटले आहे.