नवी दिल्ली– गेल्या काही दिवसांपासून विराट ज्या प्रमाणे फलंदाजी करत शतके जमवत आहे. ते पाहता आगामी काळात मास्ट्र बलास्टािर सचिन तेंडुलकरचा वनडेमधील सर्वाधिक शतकांचा (४९) विक्रमही तो मोडेल, असे मत टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
विराट कोहलीने आतापर्यंतच्याा आपल्याी छोटयाशा करिअरमध्येण विराटने अनेक विक्रमांवर आपले नाव कोरले आहे. सचिनचा विक्रम मोडण्या्साठी त्यााला फक्तण आणखी ३२ शतके बनवायचे आहेत. तो ज्याा पद्धतीने फलंदाजी करीत आहे. त्यायवरून त्याणला हे कठीण नाही, असे गौरवउद्गार गावसकर यांनी काढले. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चालू मालिकेत १५ दिवसांच्याा अंतरात त्याने दोन शतके ठोकली आहेत. भारतीय फलंदाजीची नवी तोफ असलेल्या विराट कोहलीने वनडेत सर्वांत वेगाने १७ शतके ठोकण्याचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडला आहे.
कोहलीने ११२ डावात १७ शतके ठोकली. गांगुलीपेक्षा ५८ डाव कमी खेळून कोहलीने ही कामगिरी केली. कोहली आणि गांगुलीनंतर पाकचा माजी खेळाडू सईद अनवरचा नंबर लागतो. त्याला १७ वनडे शतकांसाठी १७७ डावे खेळावी लागली. कोहली वनडेमध्येप सलग पाच अर्धशतके ठोकणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. कोहलीने गेल्याू पाच डावांमध्येय नाबाद ६८, नाबाद ६४, नाबाद १००, नाबाद ६८ आणि ११५ धावा बनवल्या आहेत.