पियुष चावला विवाहबध्द तर कार्तिकचा साखरपुडा

नवी दिल्ली – टीम इंडियाचा बॉलर पियुष चावलाने मेरठ येथील अनुभूती सिंग हिच्याशी सात फेरे घेतले. तर टीम इंडियाचा कार्तिकचा दीपिकाशी साखरपुडा झाला. टीम इंडियातील दोन सहकारी आता विवाहाच्या बेडीत अडकणार आहेत.

मुरादाबाद येथे मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीत पियुष चावला आणि अनुभूती सिंग यांचा विवाह शुक्रवारी थाटामाटात झाला. अनुभूती ही सरकारी अधिकारी अमीर सिंग यांची कन्या आहे. या दोघांचा गुरुवारी येथील हॉटेल ड्राइव्ह इन २४ येथे साखरपुडा झाला होता. त्याआनंतर त्यांनी लगेचच वि‍वाहाचा निर्णय घेतला.

टीम इंडियाचा दुसरा खेळाडून दिनेश कार्तिक याचाही स्क्वॅश खेळाडू दीपिक पल्लिकलबरोबर शुक्रवारी साखरपुडा झाला. चेन्नईतील हॉटेलमध्ये हा सोहळा थाटात झाला. २२ वर्षीय दीपिका स्क्वॅशच्या जागतिक महिला रँकिंगमध्ये पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळविणारी पहिली भारतीय आहे.

Leave a Comment