रणबीरच्या प्रेमाची करीना करणार चौकशी

रणबीर कपूर आणि कट्रीना कैफ यांच्यातील संबध सर्वांना माहिती झाले आहेत. रणबीरच्या आई-वडिलांनी देखील रणबीरच्या‍या विवाहाला हिरवा झेंडा दाखविला आहे. आता आगामी काळात रणबीरची चूलत बहीण करीना कपूर आता लेडी लवच्या बाबतीत विचारणा करताना दिसणार आहे.

आगामी काळात करण जौहरच्या टॉक शो ‘कॉफी विद करण’मध्ये रणबीर सेाबत करीना कपूर दिसणार आहे. आगामी काळात करीना कपूर रणबीरला त्यांच्या प्रेमाच्या बाबतीत विचारणा करणार आहे. या एपिसोडमध्ये करीनाने रणबीरला त्याच्या विवाहासाठी तिने कपडे खरेदी करण्यापासूनची सर्वच तयारी पूर्ण केली असल्याणचे सांगणार आहे. एवढेच नव्हे तर चिकनी चमेली आणि शिला की जवानी या गाण्यावर डान्स करणार असल्याचे ती या शोवेळी सांगणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून कैट आणि रणबीरची वाढती जवळीकता पाहून बेबोचा इशारा कैटकडेच आहे. एक डिसेबंरपासून करणचा काफी विद करण हा शो सुरू होणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदा सलमान खान सहभागी होणार आहे. त्यानंतर या शोमध्येत रणबीर व करीना ही बहिण-भावाची जोडी सहभागी होणार आहे.

Leave a Comment