पैसे कमविण्याची आवड- सैफ अली

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता सैफ अली खानला प्रसिद्धि आणि स्टारडम हे आवडत नाही. तिग्मांशु धुलियाच्या ‘बुलेट राजा’ या सिनेमात सैफअली खान मुख्य भूमिका करीत आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला मला फक्त अभिनय करणे आवडते व त्यासाठी पैसे कमविण्याची खूपच आवड आहे.

यावेळी बोलताना सैफ म्हणाला, ‘मला स्टारडम पसंत नाही, हे माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण नाही. मला गोंधळ केलेला आवडत नाही. कैमरेचा फ्लैश, ड्रामा अथवा जवळ पाहरा देणारे सुरक्षा रक्षक बिल्कुल आवडत नाहीत. मला फक्त अभिनय करणे आवडते व त्यासाठी पैसे घेणे सुध्दा मला आवडते.’

मला ध्यान आकर्षित करणे आवडत नाही. मला आराम राहणे त्याशिवाय आसपास पिफरत राहणे व सगळीकडे राहणे मला आवडते. त्यामुळेच मी देशापेक्षा जास्तीत जास्त वेळ विदेशात घालवीत असतो. विदेशात मला कोण जास्त ओळखत नसल्याने अडचण होत नाही. त्यामुळे मी विदेशात गेल्यानंतर खूपच खूष असतो, असे यावेळी बोलताना सैफ अली खान म्हणाला.

Leave a Comment