आता सीएनजी गॅस महागणार

मुंबई- नॅचरल गॅसच्या (सीएनजी) दरात रविवारपासून 15 ते 20 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता असून पाईप गॅसही पुढील महिन्यापासून महागणार आहे. सध्या 38.95 रुपये प्रतिकिलो असलेला दर 59 रुपयांवर पोहचणार आहे.

या दरवाढीमुळे सीएनजी गॅसवर चालणार्या मुंबईतील टॅक्सी, रिक्षा व बसप्रवासही महागण्याची शक्यता आहे. पाईप गॅस (पीएनजी) ही पुढील महिन्यापासून 40 ते 60 टक्क्यांनी महागणार आहे. सध्या 24 रुपये प्रती एससीएम असलेला हा दर 34 ते 39 रुपये होण्याची शक्यता आहे.

अनेक ग्राहकांनी सरकाककडून सबसिडी मिळवण्यासाठी गॅस सिलिंडर वापरण्यास सुरुवात केली. यामुळे ग्राहक कमी झाल्याने पाईप गॅसला तोटा होत आहे. सीएनजीचे दर 15 ते 20 रुपये आणि पाईप गॅसचे दर 15 रुपयांनी वाढणार असल्याच्या वृत्ताला महानगर गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विपिन चंद्रा चित्तोडा यांनी दुजोरा दिला. सीएनजी गॅस दरवाढीमुळे खतांची निर्मिती आणि वीज निर्मितीवरही याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.