तहलकाच्या व्यव. संपादिका शोमा चौधरी यांचा राजीनामा

नवी दिल्ली – संपादक तरुण तेजपाल यांच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या या दैनिकाच्या व्यवस्थापकीक संपादिका शोमा चौधरी यांनी अटक होण्याच्या भीतीपोटी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तरुण तेजपाल यांच्यावर होत असलेल्या आरोपावरून शोमा चौधरी या त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप त्यांच्यावर होत होता.

चौधरी यांनी आपला राजीनामा आपल्या संपादकीय सहकार्‍यांना उद्देशून लिहिला असून त्यात गेल्या काही दिवसांत आपल्या निष्ठेवर बोट उचलले जात असल्याने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. आपल्याला राजीनामा देताना ङ्गार वेदना होत असल्याचेही त्यांनी आपल्या या राजीनामा पत्रात नमूद केले आहे. आपण तहलकासाठी ङ्गार मेहनत घेतली आहे. अनेक वर्षे निष्ठेने काम केले आहे पण आता आपल्याला या संस्थेचा निरोप घ्यावा लागत असल्याने वाईट वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तरुण तेजपाल यांनी पीडित तरुणीशी गैरवर्तन केले आणि ही गोष्ट तरुण तेजपाल यांनी कबूल केली. यावर पोलिसांत ङ्गिर्याद नोंदवून कायद्यानुसार कारवाई करण्याचा आग्रह धरण्याऐवजी शोमा चौधरी यांनी संस्थेच्या अंतर्गत चौकशी करण्याची सूचना केली. ही बाब अवैध आहे पण अशा रितीने त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असे मानले जात आहे. त्यामुळे त्यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले आणि याच मुद्यावरून त्यांना अटकही होण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.