कोकणात शिवसेनेची सत्ता येणे अशक्य – माणिकराव ठाकरे

मुंबई – कोकणात शिवसैनिकांनी केलेल्या दंगेखोरीचे समर्थन करणा-या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येणार नाही याची भिती वाटत असल्यामुळे, उद्धव ठाकरे पोलिसांना धमक्या देत आहेत. धमक्या देण्यामुळे आतापर्यंत शिवसेना मागे राहिली. महाराष्ट्र धमक्यांवर चालत नाही हे शिवसेना पक्षप्रमुखांनी समजून घ्यावे अशा शब्दात त्यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली.

सत्ता नसताना हे कायदे मोडतात. सत्ता आल्यावर कायदा मोडण्याची भाषा करतात अशा परिस्थितीत शिवसेनेच्या राज्यात काय होईल याची कल्पना येऊ शकते असे माणिकराव म्हणाले. माणिकरावांनी कोकणात पोलिसांनी केलेल्या कारवाईचे समर्थन केले. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पोलिसांना अशी भूमिका घ्यावी लागते असे माणिकराव म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही उद्धव ठाकरेंवर टिका केली. शिवसेनेने सुपारी घेऊन दंगली घडवल्याचा आरोप त्यांनी केला.

Leave a Comment