आरुषी हत्याप्रकरणी तलवार दाम्पत्याला जन्मठेप

गाझियाबाद – गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ गुंतागुंतीच्या ठरलेल्या आरुषी आणि हेमराज हत्या प्रकरणी राजेश आणि नुपूर तलावर यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याआधी देशात गाजलेल्या आरुषी तलवार आणि हेमराज हत्याकांड प्रकरणी तलवार दाम्पत्याला कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा करावी, अशी मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली होती.

न्यायालयीन युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर तलवार दाम्पत्याला जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली. गाजियाबादच्या विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी तलवार दाम्पत्य दोषी असल्याचे म्हटले होते. तलवार दाम्पत्य हे सुशिक्षित आणि दोघेही डॉक्टर असूनही त्यांनी या दोघांची निघृण हत्या केली. त्यामुळे तलवार दाम्पत्याला या समाजात जगण्याचा कोणताही हक्क राहिलेला नाही. त्यांना कठोर शिक्षाच व्हायला हवी, असा युक्तीवाद आपली बाजू मांडताना सीबीआयच्या वकिलांनी केला.

नोयडातील जलवायू विहार येथील राजेश तलवार यांच्या निवासस्थानी आरुषी आणि हेमराज यांची मे 2008 मध्ये हत्या करण्यात आली होती. दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचे उघड झाल्यामुळेच आरुषीचे वडील राजेश तलवार यांनी त्या दोघांची हत्या केली आणि आई नुपूर तलवार यांनी पुरावे नष्ट करण्यास मदत केली, असा आरोप ठेवण्यात आला होता. हे गुन्हे सिद्ध झाल्याने आता न्यायालय त्यांना कोणती सजा सुनावणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आरुषी आणि हेमराज यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले आरुषीचे वडील राजेश तलवार आणि आई नूपुर यांचा रक्तदाब सकाळी वाढला होता. उच्च रक्तदाबामुळे नूपुर तलवार यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर तुरुंगातील डॉक्टरांच्या पथकाने उपचार केले. गाझियाबाद न्यायालयात तलवार दाम्पत्त्याच्या शिक्षेची सुनावणी दुपारी होणार आहे. देशात गाजलेल्या आरुषी तलवार आणि हेमराज हत्याकांड प्रकरणी गाजियाबादच्या विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी तलवार दाम्पत्य दोषी असल्याचे म्हटले आहे. या दुहेरी हत्याकांडात न्यायालयाने तलवार दाम्पत्याला हत्या व पुरावे नष्ट करण्याबद्दल दोषी ठरवले आहे. न्यायालयाने दोषी ठरवताच पोलिसांनी तलवार दाम्पत्याला अटक करुन त्यांची रवानगी दासना कारागृहात केली होती.

सोमवारी दुपारी ते दोघेही जेवले नव्हते. रात्रीही त्या दोघांनी जेवणाची इच्छा नसल्याने थोडेसेच खाल्ला होते. त्यातच तलवार दाम्पत्य रात्रभर झोपले नाही. रात्री विश्रांती न मिळाल्याने त्यांना मंगळवारी उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तुरुंगातील डॉक्टरांनी नूपुर तलवार यांच्यावर उपचार केले असून त्यांना तीन तास विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. दुपारनंतर तलवार दाम्पत्याला न्यायालयात आणले आहे.

Leave a Comment