उसदराबाबत शेतकरी संघटना आक्रमक

कराड – उसप्रश्नी महराष्ट्रातील शेतकरी संघटनेने पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मंगळवारी भेट घेतली मात्र यामध्ये काहीच ठरले नाही. त्यामुळे शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ऊस आंदोलन पेटत चालले आहे. आंदोलकांनी पोलिस व्हॅनसह ४० वाहनांची मोडतोड केली आहे. तर पाचवड फाट्यावर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. वारणा भागातही उसाचे ट्रॅक्टर अडवण्यात आले आहेत.

उसप्रश्नी महराष्ट्रातील शेतकरी संघटनेने पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मंगळवारी भेट घेतली. यामध्ये मात्र काहीच ठरले नाही. आगामी काळात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगट या संदर्भात निर्णय घेणार आहे. हा मंत्रीगट येत्या १० ते १५ दिवसात आपला निर्णय देणार असल्याची शक्यता आहे. मात्र या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के. व्ही. थॉमस आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे तिन्ही मंत्री उपस्थित नव्हते. या बैठकीत पंतप्रधानांनी शरद पवार यांचा उल्लेख केल्याची माहिती समजते.
या पार्श्वभूमीवर बारामती, इंदापूर तालुक्यातील साखर कारखान्यासह केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस या सगळ्या वादातून आता अंग काढून घेत आहे, असा याचा अर्थ काढला जात आहे.

Leave a Comment