मायक्रोमॅक्सचा नवा फॅब्लेट अवघ्या ८ हजार रूपयांत

मुंबई – भारतीय बाजारात विविध कंपन्यांच्या स्मार्टफोन्सची जणू जत्राच भरली असताना भारतीय स्मार्टफोन मेकर मायक्रोमॅक्सने त्यांचा कॅनव्हास ज्यूस अे ७७ या नव्या फॅब्लेटचे ऑनलाईन लॉचिंग केले आहे. हा फॅब्लेट ग्राहकांना अवघ्या ७९९९ रूपयांत मिळणार असून त्यासोबत १ हजार रूपयांचे सर्टिफिकेट तसेच एअरसेलच्या १२ हजार रूपये किमतीच्या अॅक्सेसरीज मोफत दिल्या जाणार आहेत. म्हणजे फॅब्लेटपेक्षा मोफत मिळणार्‍या वस्तूंची किमत अधिक आहे. मायक्रोमॅक्सने फेसबुकवर गेले कांही दिवस या संबंधीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

या फॅब्लेटचे नामकरण त्याच्या बॅटरीवरून करण्यात आले आहे असे समजते. ३००० एमएएचची ही बॅटरी १० तास टॉकटाईम देते. फॅब्लेटचा स्क्रिन पाच इंचाचा असून अँड्राईड जेली बीन ४.२ ची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. पाच मेगापिक्सलचा कॅमेरा शिवाय फ्रट कॅमेरा दिला गेला असून वायफाय, ब्ल्यू टूथ, टू जी, थ्रीजी अशा सर्व सेवा यासोबत उपलब्ध आहेत असे कंपनीने जाहीर केले आहे.